बंगल्याच्या अंगणात फुलले किचन गार्डन

बंगल्याच्या अंगणात फुलले किचन गार्डन लॉकडाउनच्या दीड महिन्यांच्या काळात भाजीपाला विकत घेण्याच्या त्रासातून मुक्तता नाशिक : बाजारातून फळे , भाजीपाला आणण्यापेक्षा फळझाडांची रोपे व भाजीपाल्याच्या बिया आणा या संकल्पनेवर काम करून मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरातील एका व्यावसायिकाने बंगल्याच्या अंगणात किचन गार्डन फुलवले आहे . सध्या या शेतीत अनेक प्रकारची भाज्या , फळे , कांदा , लसूण काढणीला आली आहेत . रोजच्या भाजीपाल्यासाठी मंडईत जाण्यापेक्षा घराच्या अंगणात गेल्याने ताजा भाजीपाला तर मिळतोच शिवाय घाम गाळण्यासाठी वेगळा व्यायाम करण्यापेक्षा अंगणातील या शेतीत नियमित काम केल्याने सृजनशिलतेचा आनंदही मिळतो , अशा शब्दात या शहरी शेतीचे संकल्पक सुनील दराडे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले . मखमलाबाद रोडवरील शांंतीनगर येथील इलेक्ट्रिक व्यावसायिक सुनील दराडे यांचा बंगला आहे . बंगल्यासमोरील जागेत त्यांनी सुशोभीकरणासाठी हिरवळ लावली होती . तसेच अनेक शोभीवंत रोपटे व फुलझाडांची लागवड केली होती . पुणे येथील अभिनव फार्मरचे ज्ञानेश्वर बोडके यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यां...